संत तुकारामांचे सुविचार
आशा ते करविते बुद्धीचा लोप ।
संदेह तें पाप कैसें नव्हे ? ।।
☸ अर्थात
“वासना ही माणसाला अक्कलशून्य बनवते. मग निःसंशय,
अती हाव करणे, हे पाप नाही का ?”
अवास्तव अपेक्षा करणे आणि ती पूर्ण करण्यासाठी
कोणत्याही थराला जाणे, हे बुद्धीच्या दिवाळखोरीचं लक्षण आहे.
अपेक्षा ठेवणं वेगळं आणि ती पूर्ण झालीच पाहिजे
अशी अती अपेक्षा ठेवणं, हे वेगळं.
अर्थात, अपेक्षा
नितीमत्तेला धरून असेल, तर मात्र ती पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न
करणे म्हणजे ही विचारी प्रवृत्ती झाली.
पण चोरी, मद्यपान,
परस्त्रीगमन, धन
या गोष्टींच्या तीव्र इच्छापूर्तीसाठी वाम
मार्गाने जाणे, हा अविचारीपणाच झाला. या अर्थानं
‘वासना ही बुद्धीचा नाश करते,’
आणि म्हणून
‘हे पाप नाही का?’
असं तुकोबाराय विचारतात.

No comments:
Post a Comment