EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Tuesday, July 31, 2018

याती शुद्ध परि अधम लक्षण 31/07/2018


*संतवाणी*


*याती शुद्ध परि अधम लक्षण।*
*वाया गेले तेणें सोंगें ही ते।।*
*तुका म्हणे शूर तोचि पावे मान।*
*आणिक मंडन भार वाही।।*

 _*अर्थ -* एखादा मनुष्य आपली जात शुद्ध आहे असे म्हणत असतो. परंतु त्याच्या वागण्याचे लक्षण अधमपणाचे असते.।।_
      _अशा प्रकारचे सोंग करूनही अशा माणसाचे जीवन वाया जाते.।।_
    _तुकाराम महाराज म्हणतात जो शूर असतो त्याला मान मिळतो. बाकीचा बडेजाव म्हणजे नुसते ओझे वाहने होय.।।_
 

      _माणसाचे चारित्र्यच महत्वाचे असते. जातीची तथाकथित श्रेष्ठता हे फक्त एक सोंग असते. त्याच्या द्वारे लोकांवर दबाव टाकता येतो, त्यांची फसवणूक करता येते. परंतू हे काही खऱ्या अर्थाने हितकारक नसते. ज्याच्याकडे हरेखूरे शौर्य असते त्याला शूर म्हणून मान मिळतो. इतर गुणांच्या बाबतीतही तसेच असते. खरेखुरे गुण नसतांना कोणी जात वगैरे घटक हे आपले भूषण आहे, असे म्हणत असेल तर तो नुसते ओझे वाहत असतो, तो त्या घटकाच्या आधारे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरत नाही. असे तुकाराम महाराज म्हणतात._

_*✍🏼 जगद्गुरु संत तुकाराम महाराज*_


No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers