EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Tuesday, July 31, 2018

*करावी ते पूजा, मनें चि उत्तम 31/07/2018


संत तुकारामांचे सुविचार*

*करावी ते पूजा, मनें चि उत्तम ।*
*लौकिकाचें काम काय असे ? ।।*
*कळावें तयासी कळें अंतरीचें ।*
*कारण तें साचें साच अंगी ।।*

अर्थात*

*“ईश्वराची पुजाच करायची आहे ना*
*तर मग ती मनातल्या मनात करा.*
*त्यासाठी फुलं, नारळ, उदबत्ती, पैसा*
*या सर्व बाह्य ‘प्रसिद्धी’ची काय गरज?*
*अत्यंत शांतपणे ‘नामस्मरणाने’ सुद्धा*
*ईश्वराची उत्तम पूजा होऊ शकते.*
*आणि हो,*
*आता एवढी शांतपणे केलेली पूजा*
*लोकांना जरी कळत नसली, तरी ज्याला कळणं गरजेचं आहे,*
*त्याला तर कळणारचं ना!”*

भक्तीतल्या दिखाव्याला तुकोबारायांनी टाळायचं सांगितलं आहे.*

   *अभंग संकलन व त्यावरील विवेचन*
  - *विजय गवळी*

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers