EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Friday, August 3, 2018

आजचा विचारधन

  ध्यास

काही काहींना सतत
नव्याचा ध्यास असतो 
यशस्वी होण्याचा तोच
तर खरा श्वास असतो 

ध्यास धरणाराला खरं 
यशस्वी होता येत 
ख-या अर्थाने यशाचं
गाणं त्याला गाता येत 

   शरद ठाकर 

=========ஜ۩۞۩ஜ=========
आजचा विचारधन
=========ஜ۩۞۩ஜ=========

*'रियाज' म्हणजे आपल्यातील आपलाच शोध. या शोधातूनच कलावंताला आपल्या निर्मीतीचे कंद प्रतीत होतात. नव्या पायवाटांचे मागमूस कळतात. नव्या स्विकार-नकारांचे ध्वनी ऐकू येतात. नव्या प्रकाशाची किरणं मनाच्या आकाशात फाकू लागतात. सहस्त्ररश्मींचा मोरपिसारा मनामध्ये फुलून येतो. माणसाचं कवित्व रियाजानं अधिक प्रगल्भ आणि सहज सुलभ होतं. गाणं आधिक सकस आणि लयतत्व साकारत जातं.*

*'रियाज' आपल्यातील शक्यतांचा विस्तार नजरेत आणणारा विधी होय. आपल्या निर्मितीची किती क्षितीजं आपल्यासमोर उभा करतो तो. तो आनंदसोहळा होतो. हा आनंद हिंदोळ्यावर झोके घेतो. रसिकांच्या रसिकत्वाला आवाहन करीत राहतो. त्यांच्या चित्तवृत्ती पुलकित करीत राहतो. रियाजामुळे मनावर चढलेली पुटं नाहीशी होतात. ज्ञानेंद्रियांना अनेकविध चेतना मिळतात. त्या चेतनेने सारा भवताल 'चैतन्यपूर्ण' होतो.*

        *--संजय नलावडे

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers