EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Thursday, July 26, 2018

*पं. सुरेश वाडकर*

सौजन्य : मंदार पंडित*

*बाबूजी....*
*सूर अजूनही गाती....*

*पंसुरेश वाडकर*


जगभरातील मराठी माणसाच्या भावविश्वाचा एक हळवा कोपरा सदैव व्यापून असलेले श्रेष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ लाडके बाबूजी यांचं जन्मशताब्दी वर्ष येत्या २५ जुलैपासून सुरू होत आहेबाबूजींची गाणी आणि त्यातलं वैविध्य आज एवढ्या वर्षांनंतरही तेवढंच मोहवून टाकतंत्यांच्या गाण्याचंसंगीताचं आणि स्वरवैभवाचं विश्लेषण एखाद्या उत्तम गायकाहून अधिक चांगल्या प्रकारे कोण सांगू शकेल

बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांच्याबरोबर खूप काम करण्याचा योग मला आला नाहीपरंतु त्यांची गाणी स्वतःत मुरवण्याचा योग मात्र भरपूर आलात्यांनी संगीतबद्ध केलेलीत्यांनी गायलेली गाणी लहानपणापासून ऐकत आलोसुरुवातीला ती गाणीत्यातल्या अवीट गोडीच्या सुरांमुळे भावलीथोडंसं संगीत कळायला लागल्यावर त्याच गाण्यांमधली तीच अवीट गोडी तिच्या मर्मासकट समोर आली आणि प्रत्येक गाणं हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहेहे पुरेपूर पटलंएकेक ओळ सुरांनी रंगवताना ती बाबूजींनी खूप जबाबदारीनं रंगवलीअसं त्यांचं प्रत्येक गाणं ऐकताना आपल्या लक्षात येतं. 

रोज आपण बोलतो ती भाषा गायनातून कशी म्हणावी ते त्यांनी सोदाहरण सांगितलंत्यांच्या शुद्ध उच्चारणाचा आग्रह हा त्यातूनच आलेला आहेअर्थातयात कुठंही अट्टहास नाहीएखादा आकार गायचाय म्हणून कोणताही अभिनिवेश  करता तो साहजिक कसा गावाहे त्यांनी दाखवून दिलंअसं करताना आपण भावसंगीत गातो आहोतत्यामुळे त्यांतला अर्थ - जो शब्दांच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहेतो प्रत्येक शब्द स्पष्ट कळावा हा मात्र त्यांचा आग्रह असेत्यामुळे अगदी लांबवर जरी बाबूजींचं गाणं वाजत असलं तरी त्यातले शब्द स्पष्ट ऐकू यायचे. 
बाबूजींची गाणी ही सर्व वयोगटातल्या श्रोत्यांना आवडतील अशी आहेतअसं सर्व वयोगटात प्रिय होण्याचं भाग्य फार कमी व्यक्तींना मिळतंअनेक संगीतकार किंवा गायक हे तरुणांमध्ये लोकप्रिय असतात आणि ते त्याच वयोगटात लोकप्रिय राहतातपरंतु बाबूजींची लोकप्रियता ही सर्व वयोगटात आहेम्हणूनच ती कालातीत आहेयाचं कारणमला असं वाटतं की त्यांची संगीताची व्याप्ती किंवा रेंज फार मोठी आहेभक्तिगीतांपासून ते लावण्यांपर्यंत आणि प्रेमगीतांपासून विरहगीतांपर्यंत त्यांनी सांगीतिक योगदान दिलेलं आहेमाझे सुगम संगीत क्षेत्रातले तीन आदर्श आहेतबाबूजीलताबाई आणि आशाताईबाबूजींचा संगीतकार म्हणून मी जेव्हा विचार करतोतेव्हा मला लताबाईंचं वाक्य नेहमी आठवतंत्या म्हणतातकी गाण्यातून तो संगीतकार दिसला पाहिजेबाबूजींच्या प्रत्येक गाण्यातून ते स्वच्छ दिसतात. 
त्यांच्या गाण्यांमधल्या बारीक बारीक जागा आपल्याला मोहवून टाकतातत्यामुळे त्यांचं प्रत्येक गाणं एकताना हे आपण सहज गाऊ शकूअसं वाटतं खरंपण बारकाईनं ऐकत गेलात तर त्यातल्या असंख्य जागा तुम्हाला अचंबित करून टाकतातया जागा काही चमत्कृती करायची म्हणून तिथं घातलेल्या नाहीतबाबुजींचं प्रत्येक गाणं हे समाधी अवस्थेकडे नेणारं आहेअसं मला प्रामाणिकपणे वाटतंते गाणं आत्मिक आनंद देणारं आहेत्यांना मी ज्या ज्या वेळेला ऐकतोतेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून येतातत्यांचं गाणं थेट काळजाला भिडतं. 

'आम्ही जातो अमुच्या गावाचित्रपटातलं 'हवास मज तू हवास तूहे गाणं उदाहरणादाखल घेऊहे गाणं म्हटलं तर उडत्या चालीचं आहेतरीही ते काळजाला भिडणारं आहेत्यात प्रसंगानुसार केलेली गंमत आहेनुसतं गाणं ऐकलं तरी संपूर्ण प्रसंग डोळ्यांसमोर रंगवता येतोइतकी ताकद त्या सुरावटीमध्ये आहेइथं सुरांचा प्रयोग फार छान केलाय'लाखाची गोष्टमधलं 'त्या तिथे पलीकडे तिकडे...हे गीतही असंच आहेत्यातल्या प्रत्येक शब्दाला न्याय देताना त्याचा अर्थ चालीतून प्रतिबिंबित होईलयाचं भानं बाबूजींनी ठेवलेलं आपल्याला दिसतंत्यामुळे या मुखड्यातून ते 'माझिया प्रियेचे झोपडेकिती अंतरावर असेल याचा पूर्ण अंदाज श्रोत्याला देतातशब्दाचं वजन तर प्रत्येक संगीतकार ओळखतोपण अनेक संगीतकार गाणं सुचलं आणि ते केलं असं करतातबाबूजींच्यात आणि त्यांच्यात थोडासा फरक असा आहे कीबाबूजी गाणं सुचलं म्हणून करताना ते सुचलं - त्यावर विचार केला आणि ते केलंया पायरीने जात होतेत्यामुळे त्यांच्या कुठल्याही गाण्याचा आत्मा हा त्यातल्या उत्स्फूर्ततेत आहे हे आपल्या लक्षात येतं. 

बाबूजी संगीतकार होतेतसंच ते गायकही होतेत्यामुळे त्यांनी संगीतबद्ध करून स्वतः गायलेल्या गाण्यांना १०० टक्के न्याय मिळालाअसं म्हणता येईल'आकाशी झेप घे रे पाखरा', 'प्रभातसमयो पातला', 'पराधीन आहे जगतीअशी अनेक गाणी उदाहरणदाखल घेता येतीलकी ज्यातून संगीतकार बाबूजीच गायक असल्यामुळे त्याला शतप्रतिशत न्याय मिळालाबाबूजींनी यमनधानीभीमपलासभूप अशा रागांवर आधारित खूप गाणी बांधलीतुम्ही संगीतगुरूंकडे गेलात तर अनेकजण यमन राग शिकवण्यापासून सुरुवात करताततेव्हा लोकांना वाटतं की यमन हा सोपा राग आहेपण वास्तवात यमन हा अत्यंत कठीण राग आहेत्याचे असंख्य पैलू आहेतत्याच्या मानमर्यादा सांभाळण्यासाठी रियाजात अनेक वर्षं घालवावी लागतातरोज हा राग नवं रूप घेऊन समोर उभा राहतोभूप हा पाच स्वरांचा रागतोही खूप अवघड आहेत्याच्यावर प्रभुत्व मिळवलंत की मग अन्य राग तुम्ही नीट हाताळू शकताअर्थात हे तुम्हा-आम्हाला रियाजाने साधू शकतंपण बाबूजींसारखी काही व्यक्तिमत्त्वं ही दैवी देणगीच असते आपल्याला मिळालेलीत्यांना हे सगळं सहजशक्य होतंत्यामुळे बाबूजींनी यमन रागाचा उपयोग अप्रतिम केलायत्याचे अनेक पैलू त्यांनी चालींमधून दाखवले'जिथे सागरा धरणी मिळते', 'तोच चंद्रमा नभातही यमनवर बेतलेली गीतं नुसती आठवून पाहाअंगावर रोमांच उभे राहतील. 
बाबूजींचा गायनामागचा दृष्टिकोन हा प्रेमभक्तिमय होता'बाई मी पतंग उडवित होतेहे त्यांचं गाणं मला खूप आवडतं'जाऊ द्या सोडा जाऊ द्याही बैठकीची लावणीही त्यांनी अप्रतिम केली आहे'जाळिमंदी पिकली करवंदंहे गाणंही असंच गोड झालंय'हा माझा मार्ग एकलाहे गीत पाहायातली '...संपली कहाणीहे दोनच शब्द पुनःपुन्हा ऐकात्यातली आर्तता काळजाला भिडते'संपली कहाणीम्हणताना त्यातली हताशा त्यांनी दाखवली आहेअसा सखोल विचार हिंदीमध्ये एसडीबर्मनसारख्या निवडक लोकांनी केला आहे. 
त्यावेळचे संगीतकार फार विचारपूर्वकत्यांच्या चालीला कोण न्याय देऊ शकेलत्यालाच गायला बोलवायचेबाबुजींनी त्यांच्या चालींना न्याय देतीलअशाच गायक-गायिकांना बोलावलंकेवळ तो गायक किंवा ती गायिका लोकप्रिय आहे म्हणून त्यांनी कधीही बोलावलं नाही'मुक्या या कळीला तुझा स्पर्श व्हावायासारखी अप्रतिम चालीची गाणी त्यांनी मला दिलीत्यातलं 'तुझा स्पर्श व्हावाही ओळ त्यांच्यासारखी मला जमायला दोन दिवस लागलेत्यांनी मला विश्वास दिलाते म्हणायचे, 'वाडकरतुम्ही गातायतुम्ही गाता आणि तुम्ही गाल!बाबूजींचाच वारसा चालवत श्रीधर पुढे जातोयत्याच्याबरोबर 'तेजोमय ज्ञानब्रह्मकेलं तेव्हा पदोपदी बाबूजींचा भास व्हायचाकिंबहुना श्रीधर आणखी कठीण आहे बाबूजींपेक्षाअसं मी म्हणेन! 
'तोच चंद्रमा नभात'चं उदाहरण पुन्हा घेतोत्यातली 'तीच चैत्रयामिनीही ओळ म्हणताना त्यांनी दोन मात्रांमधला अंश सुरांनी भरला आहेहे गाणं म्हणजे गाताना कुठं थांबावंशब्द कसा म्हणावाशब्दाला जोडलेल्या सुराच्या आसेचा विचार कसा करावायाचा वस्तुपाठच आहेत्यामुळे ते गाणं नुसत्या ठोक्यावर किंवा बीटवर नाहीयेसुरांचा अंश भरत भरत बीटवर गायचं ते गाणं आहेआपल्याकडे काही संगीतकारांची गाणी गायला नुसतीच कठीण असतातबाबूजींची गाणी गायला कठीण असूनही आनंद देणारी असतात. 

'गीत रामायणहा तर एक चमत्कारच आहेत्याच्या पलीकडे जाऊन मला असं म्हणावंसं वाटतं की, 'गीत रामायणहे संगीत आणि शब्दांचं सुंदर प्रारब्ध आहेचांगल्या अर्थानं असं म्हणावं लागेल की बाबुजी आणि गदिमांना पिसाटलं होतंते पिसाटणं कलात्मकेच्या अत्युच्च पातळीवर गेलं नसतंतर 'गीत रामायणझालंच नसतंपन्नासहून अधिक गाणीप्रसंगानुरूपअर्थानुरूप करणं हे सोपं काम नाहीचत्यात विषय आहेतो काळ आहेत्या काळाला अनुरूप असे शब्द निवडण्याचं कसब आहे आणि संपूर्ण कथेला प्रवाहीपण देताना सुश्राव्य चाली देणं ही परीक्षाही आहेबरं हे व्यक्त करायला केवळ ध्वनी हे एकच माध्यम आहेहे अवघड होतंम्हणूनच ते दैवी आहेत्यातही 'गीत रामायणा'चं श्रेय द्यावं लागेल ते आकाशवाणी मुंबईलाहीत्या माध्यमानं त्या काळी हे धाडस केलं आणि हा चमत्कार श्रोत्यांपर्यंत पोहोचवला. 
शेवटी एकच सांगेनप्रत्येक नवोदित गायकानेसंगीतकाराने बाबूजींची गाणी लक्षपूर्वक ऐकावीतत्यांचा रियाज करावाहा स्वरखजिना हाताळावातरच तुम्हाला काव्यात येणारे कठीण वर्ण त्यांचा गोडवा कमी  करता मृदुपणे कसे उच्चारायचे ते कळू शकेलभाषेची ताकद दाखवताना त्यातली भावात्मकता कशी जपून ठेवायची ते कळू शकेल आणि मुख्य म्हणजे सांगीतिक चमत्कृती  करता सुरांना लडिवाळपणे कसं हाताळायचं त्याचंही भान येऊ शकेलऐकणारा आणि गाणारा किंवा संगीत देणारा यांची हृदयं जुळलीसूर जुळले तर ते संगीत दीर्घकाल टिकून राहतंबाबूजींच्या गाण्यांच्या ओळी आहेत'त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती...बाबूजींचे सूर आपल्यासाठी अजूनही गात आहेतगात राहतील



सुरेश वाडकर

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers