EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Sunday, July 29, 2018

संत तुकारामांचे सुविचार-वाराणसी, गया पहिली द्वारका

संत तुकारामांचे सुविचार

वाराणसी, गया पहिली द्वारका ।
परी न ये, तुका पंढरीच्या ।।
पंढरीसी नाही कोणा अभिमान ।
पाया पडे जन एकमेका ।।

 अर्थात

मी अनेक तिर्थक्षेत्रांना भेटी दिल्या.
त्यातल्या महत्वाच्या मानल्या गेलेल्या
वाराणसीला जाऊन आलो.
गया पहिली, द्वारका पहिली.
या सगळ्या ठिकाणच्या
काही धार्मिक गोष्टी बघून
माझ्या लक्षात आले, की या तीनही तिर्थक्षेत्रांची एकत्रित मिळून सुद्धा वारकऱ्यांनी वैकुंठ मानलेल्या ‘पंढरपूर’ सोबत तुलना होऊ शकत नाही.
याला मुख्य कारण म्हणजे, सर्व तिर्थक्षेत्राला वर्णाभिमानी लोकं आहेत. माझा वर्ण, जात श्रेष्ठ आहे, असं मानणारी माणसं भेटली.*
*ब्राह्मणांना शुद्रांकडून स्वतःच्या पाया पडून घेताना मी पाहिलं. हे सर्व बघून, आता या सर्वांची तुलना पंढरपुराशी का होत नाही हे सांगतो.*
*तर असं पहा की, ‘पंढरपुरात कुणीही स्वतःला ब्राह्मण आणि शुद्र मानत नाही.’*
*अक्षरशः सर्वच वारकरी हे एकमेकांच्या पाया पडताना दिसतात.”*

   *अभंग संकलन व त्यावरील विवेचन*
           - *विजय गवळी*

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers