जाणून घेऊयात औषधाविना रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे उपाय...🚶🏻♂चालणं
▫आठवड्यातून किमान 5 दिवस अर्धा तास चालणं हा रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फार महत्त्वाचा व्यायाम आहे.
🕺🏻वजन घटवणं
▪कंबरेचा वाढता घेर हा उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फार त्रासदायक ठरतो.
▫आहारात आणि व्यायामात बदल करून तुम्ही पोटाजवळील चरबी आपण हटवू शकतो
सोडीयम घटक कमी करा
▫खारावलेले पदार्थ, अळणी पदार्थांवर वरून मीठ टाकून खाणं टाळा.
▪त्याऐवजी आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश वाढवा.
▫केळं, भोपळ्याच्या बीया अधिक फायदेशीर आहेत.
🥂❌ मद्यसेवनावर नियंत्रण
▫उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेतल्यानंतर किंवा आधी मद्यपान करत असलात तर त्यामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो.
🤦🏻♂ताण तणाव कमी करा
▫मानसिक धक्का बसेल किंवा तणाव अचानक वाढेल अशा परिस्थितींपासून शक्यतो दूर रहा.
▪तुमच्या आवडत्या छंदामध्ये, योगाभ्यासामध्ये मन रमवा.
▫यामुळे हळूहळू ताण हलका होण्यास मदत होते.
No comments:
Post a Comment