तुकास्र - 96
☸ अर्थात
बेडूक साचलेल्या पाण्याच्या घाण डबक्यातच बसतो, पण त्याला विशाल समुद्राचा हेवा वाटतो आणि तो चक्क त्या समुद्राचा धिक्कार करतो.
वास्तविक डबक्यातल्या त्या बेडकानं समुद्र कुठं आहे, केवढा आहे हे बघितलेलंही नसतं.
पण तो उगाचंच ‘डराव-डराव’ करत आपलं तोंड पिटत बसतो, समुद्राला नाव ठेवत बसतो.
आणि विशेष, आपल्याच घाण डबक्यात बसण्याचा हट्ट करत बसतो.
तुकोबारायांनी बेडकाची उपमा नेमक्या कोणत्या प्रवृत्तीच्या माणसांना दिली आहे, हे खूप विश्लेषण करून सांगण्याची गरज नाही. कारण आपल्या प्रत्येकाच्या अवती-भोवती अशी अनेक बेडूके आपण प्रत्यक्ष पाहतच असतो, अनुभवतंच असतो.
🙏 संत तुकारामांचे सुविचार🙏
वसनें थिल्लरीं ।
बेडूक सागरा धिक्कारी ।।
नाही देखिला, ना ठावा ।
तोंड पिटी, करी हावा ।।
बेडूक साचलेल्या पाण्याच्या घाण डबक्यातच बसतो, पण त्याला विशाल समुद्राचा हेवा वाटतो आणि तो चक्क त्या समुद्राचा धिक्कार करतो.
वास्तविक डबक्यातल्या त्या बेडकानं समुद्र कुठं आहे, केवढा आहे हे बघितलेलंही नसतं.
पण तो उगाचंच ‘डराव-डराव’ करत आपलं तोंड पिटत बसतो, समुद्राला नाव ठेवत बसतो.
आणि विशेष, आपल्याच घाण डबक्यात बसण्याचा हट्ट करत बसतो.
तुकोबारायांनी बेडकाची उपमा नेमक्या कोणत्या प्रवृत्तीच्या माणसांना दिली आहे, हे खूप विश्लेषण करून सांगण्याची गरज नाही. कारण आपल्या प्रत्येकाच्या अवती-भोवती अशी अनेक बेडूके आपण प्रत्यक्ष पाहतच असतो, अनुभवतंच असतो.

No comments:
Post a Comment