EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Thursday, August 2, 2018

तुका म्हणे व्हावें तयापरी धीट ।



🙏 संत तुकारामांचे सुविचार🙏


तुका म्हणे व्हावें तयापरी धीट ।
पतंग हा नीट दीपासोई ।।

अर्थात

पतंग हा कीटक, ज्याप्रमानं दिव्याकडं मरणाचीही पर्वा न करता झेप घेतो,
त्याप्रमाणं आपण साहसी बनलं पाहिजे.”

न घाबरता संकटांना सामोरं जा, हिम्मत करा, हातात घेतलेल्या कामाला पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करून त्या कामावर तुटून पडा, जणू असा संदेशच तुकोबाराय अपल्याला देत आहेत.

पतंग नावाच्या एका क्षुल्लक अशा किटकाकडूनसुद्धा तुकोबाराय साहसाची प्रेरणा घेतात, आणि आपल्यालाही ती प्रेरणा घेण्याचं आवाहन करतात. यात त्यांची ‘मिळेल तिथून ज्ञान ग्रहण करण्याची प्रवृत्ती’ आणि निरीक्षण क्षमता दिसून येते.

   अभंग संकलन व त्यावरील विवेचन
           - विजय गवळी

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers