EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Friday, August 3, 2018

*संत तुकारामांचे सुविचार* हिरा ठेवितां ऐरणी ।

*संत तुकारामांचे सुविचार*

*हिरा ठेवितां ऐरणी ।*
*वांचे, मारितां जो घणीं ।।*
*तोचि मोल पावे खरा ।*
*करणीचा होय चुरा ।।*

*☸ अर्थात*

*“ऐरणीवर ठेवून हातोड्यानं मारलं असता जो फुटत नाही, तोच खरा हिरा. आणि त्याचीच बाजारात मोठी किंमत होते. जे कृत्रिमपणे घडवलेले असतात, अश्यांचा तर एकाच घावात अक्षरशः चुरा होतो.”*

*माणूस आयुष्यात प्रगतीसाठी अनेक कामे करत असतो. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. कष्ट सहन करतो. अनेक प्रसंगांना त्याला सामोरं जावं लागतं. हे सर्व करत असताना प्रतिकूल परिस्थितीच्या माराणं जो खचत नाही, माघार घेत नाही, तोच जीवनात यशस्वी होतो. जे या परिस्थितीच्या बसणाऱ्या घावांना घाबरतात, मनानं खचून जातात, ते मात्र अपयशी होतात. त्यांची अवस्था घडवलेल्या आणि हिऱ्या सारख्या दिसणाऱ्या चमकत्या काचेच्या थोड्या-थोड्या आघाताने तडकणाऱ्या, चुरा होणाऱ्या कच्या वस्तुप्रमाणे होते.*

*म्हणून जेवढं तुम्ही सहन कराल, तेवढं तुम्ही यशस्वी व्हाल. आणि जेवढं तुम्ही यशस्वी व्हाल, तेवढे तुम्ही माणसाच्या व्यवहारी बाजारात जास्त किमतीवान व्हाल.*

*तुमची Market Value मोठी राहील.*

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers