आजचा विचारधन
जीवनाचे अध्यात्म समजून घेताना रोज जगण्यातील प्रत्येक घटनेचा ऊहापोह चिंतनाच्या पातळीवर करणे आवश्यक असते. तेव्हांच दैनंदिन जीवनप्रवाहात अध्यात्म उतरू शकते. योग्यायोग्यतेचा निवाडा करून सुयोग्य मार्गावरून चालणे आणि आपल्यांसह इतरांनाही त्या मार्गावरून घेऊन जाणे जमायला हवे. याची सुरूवात आपल्यापासून करून मग ते इतरांना शिकविले, तर ते आचरणशील होते. अलीकडे लग्न व इतर उत्सवादी कार्यक्रमात अन्न टाकू नये, असे सांगितले जाते. जेवताना अन्न टाकायचे नसतेच, तो सुसंस्कृत जगण्याचा अविभाज्य भाग आहे; पण तरीही भराभर वाढून घेणे आणि नुसतीच चव चाखून ते टाकणे, असा
त-हेवाईकपणा वाढतो आहे.
आपले तत्वज्ञान तर अन्न प्राशनाविषयी खूप खोलवर जावून बोलते. अन्नाची निंदा करू नये आणि ते टाकू नये, असे साक्षात् उपनिषदांनी नोंदवून ठेवले आहे. त्याचे पालन होत नाही. बाहेरील मोठा कार्यक्रम तर जाऊ द्या: पण घरातही खूप अन्न वाया जाते. त्याचा विचार व्हावा. रोज हजारो भुकेल्यांचे पोट भरेल एवढे अन्न राज्यात वाया जात असेल. ते जर आपण वाचवले, तर 'अन्नदान श्रेष्ठदान' सारखी अध्यात्मिक कृती घडेल. Money saved is money earned याचा अर्थ पैसा वाचविणे हे पैसा मिळविण्यासारखेच असते. तसेच अन्नाचा काटकसरीने वापर करणे हे अन्न निर्माण करण्यासारखेच आहे.

No comments:
Post a Comment