EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Friday, July 27, 2018

आजचे विचारवेध..2

आजचे विचारवेध..


एखादे झाड जेव्हा उभे राहते तेव्हा त्या झाडावर असंख्य जीव आनंदाने जगत असतात. पशू आणि पक्षी सावलीचा आधार घेतात, अनेक जीवांना अन्य मिळते, सभोवताली चैतन्याचे वातावरण पसरलेले दिसते, कुण्या जीवाला राहण्यासाठी सहारा मिळतो, शुद्ध हवा मिळते तर अजून बरेच काही मिळते, पाणीपाऊस, अन्न, पर्यावरण संतुलन आणि रक्षण. एक झाड एवढे परोपकारी असूनही ते स्वत:साठी काहीच करत नाही, पाऊस पडलातरी अंगावर झेलतोे, ऊन पडले तरी सहन करतो, थंडी पडली तरी इतरांना ऊब देतो आणि स्वत: काकडत उभा राहतो. एवढे करुनही तो कधीच कुणाकडे तक्रार करत नाही किंवा मी केल्याचा अहंकारही नाही. शेवटी तोडलंतरी तो निमुटपणे घाव सोसतो. फक्त इतरांसाठीच ना ?
मग आपण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने करण्यासारखे असूनही आपली इतरांच्या बाबतीत संकुचित वृत्ती का जोपासतो ?आपल्याला चालता येतं, बोलता येतं, इतरांच्या भावना ओळखता येतात तरीही आपण इतरांसाठी काही करत नाही. मनुष्यप्राण्याने निदान एवढेतरी करायला हवे. वृक्ष जर इतरांसाठी जगतात आणि इतरांसाठी स्वत: जळून जीवन समर्पित करतात तर आपण का करु नये. ज्यांच्यामुळे आपण आहोत त्यांच्या रक्षणासाठी, त्यांच्या संगोपनासाठी आपणही आपला हात पुढे करून सा-या जीवांचे रक्षण करण्यासाठी हातभार लावायला शिकले पाहिजे. आपणही आपली स्वार्थी भूमिका बाजूला ठेवून इतरांसाठी वृक्षाप्रमाणे जीवन जगायला शिकले पाहिजे. आपल्यातला मीपणा बाजूला सारून इतरांसाठी आपण जीवन जगण्याबरोबर इतरांच्या जीवन जगण्याकडे लक्ष द्यायला शिकले पाहिजे. असा संकल्प जर प्रत्येकाने केला तर आपणही आपल्या जीवनात काहीतरी परार्थासाठी केल्याचे समाधान वाटेल.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers