EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Friday, July 27, 2018

१०४ वर्षांनंतर दिसले सर्वात दीर्घ चंद्रग्रहण; ३ तास ५४ मिनिटे

१०४ वर्षांनंतर दिसले सर्वात दीर्घ चंद्रग्रहण; ३ तास ५४ मिनिटे चालला पृथ्वीच्या सावलीचा खेळ
28 Jul. 2018 06:50




नवी दिल्ली- शुक्रवारी रात्री ११.५४ वाजता चंद्रावर पृथ्वीची सावली पडली आणि गेल्या १०४ वर्षांतील सर्वात मोठे चंद्रग्रहण लागले. तब्बल ३ तास ५४ मिनिटे ३३ सेकंदांचे हे चंद्रग्रहण पहाटे ३.४९ वाजता सुटले. या काळात १ तास ४३ मिनिटे खग्रास चंद्रग्रहण पाहावयास मिळाले. २ च्या सुमारास काही वेळ तांबूस चंद्र (ब्लड मून) दिसला.
असे झाले चंद्रग्रहण
रात्री १०.५३ : चंद्रास पृथ्वीच्या सावलीचा स्पर्श. मात्र ते दिसले नाही.
११.५४ : चंद्रग्रहण देशभरात काही जागी सहजपणे दिसू लागले.
१.५१ : खग्रास चंद्रग्रहण, ब्लड मून अवस्था दिसू लागली.
२.४३ : ग्रहण माेक्ष काळ सुरू.
५.०० : चंद्रग्रहण पूर्णपणे समाप्त.
३ तास ५४ मिनिटे चालला पृथ्वीच्या सावलीचा खेळ.
ग्रहणाची सर्वात चर्चित गाेष्ट... कोलंबसने ग्रहणाच्या नावावर पूर्ण गावाला मूर्ख बनवले होते
सुमारे ५०० वर्षांपूर्वी महान खलाशी कोलंबस एका बेटावर ६ महिने अडकले होते. ग्रामस्थ त्यांना अन्नपाणी देत नव्हते. लवकरच ग्रहण असल्याचे कोलंबस यांना ठाऊक होते. ते ग्रामस्थांना म्हणाले, ‘तुम्ही मला उपाशी ठेवत आहात. यामुळे देव संतापून आता चंद्रालाच गायब करणार आहे.’ ग्रहणात चंद्र झाकोळून गेला. यामुळे कोलंबसकडे दैवी शक्ती असल्याचे ग्रामस्थांना पटले. मग कोलंबस यांना ग्रामस्थ जेवण देत राहिले.
Bhaskar




No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers