EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Thursday, July 19, 2018

जरुर वाचा

  जरुर वाचा  👇  🎯


           आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही .! 
           मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत .
           आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका . कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?         
           जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल ...! 
           तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका . त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या . स्वतःचे भविष्य घडवू द्या . त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका . 
           मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या , त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर , स्वतःच्या आवडी निवडीवर करा .
           जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही , हे देखील लक्षात ठेवा .
             तुम्ही कदाचित चाळीशीत , पन्नांशीत किंवा साठीत असाल , आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत . पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही . 
             या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात . पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल . तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !
           एक दिवस आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात  एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात , हे लक्षात असू द्या. 
            आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर , उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल , आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल , तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत . 
            सगळ्यात महत्वाचे  म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा . त्याची जपवणूक करा आणि हो ! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका , त्यांना जपा . हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
           मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो .... आयुष्य खुप कमी आहे , ते आनंदाने जगा ...👍

  !! लाईफ सही तो ... हेल्थ सही !!😇🌹

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers