जनहितार्थ
आज जवळपास प्रत्येकाकडे टु-व्हिलर थ्री-व्हीलर फोर-व्हीलरआहे. गाडी सर्व्हिसींग करतांना Oil बदलले जाते , ते oil गॕरेजमधेच सोडून न देता प्रत्येकाने घरी आणावे . आणि एक झाकण भरून oil रात्रीच्या वेळी नालीत टाकावे. ज्यांचेकडे नाली नाही त्यांनी सांडपाणी जेथून बाहेर जाते त्या ठिकाणी टाकावे. असे अधून-मधून करावे.
त्यामुळे पाणी आणि oil वाहून जातांना ज्या ठिकाणी नालीत पाणी साचते तेथे पाण्यावर तेलाचा पातळ थर जमा होतो.या परिणामी डासांची अंडी , अळ्या मरतात. यामुळे डास निर्मिती होत नाही.
डासांचा प्रादुर्भाव रोखण्याचा एक सोपा उपाय.
सर्वांनी करून पाहण्यास काहीच हरकत नाही.
दिवसेंदिवस वाढणार्या शहरीकरणामुळे सार्वजनिक अस्वच्छतेचे प्रमाण देखील वाढले आहे. परिणामी डासांची उत्त्पती वाढून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे. मग डासांना दूर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली केमिकलयुक्त उत्पादन ( रिपॅलंट) वापरल्यास त्याचा उलट परिणाम मानवी शरिरावरच होतो. मग डासांना तुमच्यापासून दूर करण्यासाठी हे ‘१०’ नैसर्गिक उपाय नक्की करून पहा.
1) कडूलिंबाचे तेल :
मानवी आरोग्य निरोगी ठेवण्याचे अनेक गुणधर्म कडूलिंबात आहेत. मात्र औषधी गुणधर्माप्रमाणेच कडूलिंब डास दूर ठेवण्यास देखील मदत करते. ‘
Journal of the American Mosquito Control Association’ने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कडुलिंब व खोबरेल तेल समप्रमाणात घेऊन शरिराला लावल्यास डास तुमच्यापासून दूर राहतात. कडूलिंबातील अॅन्टीबॅक्टेरिएल, अॅन्टीफंगल, अॅन्टीवायरल व अॅन्टीप्रोटोझोअल गुणधर्मांमुळे येणार्या वासातून डास तुमच्या त्वचेपासून दूर राहतात. कडुलिंब व खोबरेल तेलाचे मिश्रण तुम्ही शरिराला लावल्यास किमान 8 तास तुमचे डासांपासून रक्षण होते.
2) निलगिरी व लिंबाचे तेल :
सी.डी.सी (Center for Disease Control) यांच्यानुसार, नैसर्गिकरित्या डासांना दुर ठेवण्याचे काम निलगिरी व लिंबाचे तेल करते. या तेलामधील सिनिओलच्या ( cineole) घटकांमुळे त्वचेचे रक्षण होते. बाजारात मिळणार्या रॅपॅलंटपेक्षा (मच्छरांना दूर ठेवण्यासाठी अंगाला चोळायचे औषध ) निलगिरी व लिंबाच्या मिश्रण लावणे अधिक चांगले. यामुळे शरिरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. निलगिरी व लिंबाचे तेल समप्रमाणात घेऊन शरिराला लावा व तुमचे डासांपासून रक्षण करा.
3) कापूर :
डासांपासून रक्षण करण्यासाठी ‘कापूर’ देखील अत्यंत उपयुक्त आहे.डासांना दूर करण्याकरिता इतर नैसर्गिक उपचारांपेक्षा कापूर अधिक चांगले परिणाम देतो. घरातील दारं-खिडक्या बंद करून कापुर जाळा व त्याचा धूर 15-20मिनिटे घरात राहू द्या. यामुळे घरातील डास दुर होण्यास मदत होते. संध्याकाळच्या वेळी धूप करताना त्यात कापूर टाकला तरीही डास दूर होण्यास मदत होते.
4) तुळस:
‘Parasitology Research Journal’ ने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, तुळस डासांच्या अळ्या मारण्यास अत्यंत प्रभावी असल्याने डास दुर ठेवण्यास मदत करते. आयुर्वेदातसुद्धा खिडकीत /घराजवळ तुळशीचे रोपटे लावणे हितकारक असल्याचे सांगितले आहे. यामुळे डासांची उत्त्पती कमी होते व त्यांचा घरातील प्रवेश रोखला जातो.
5) लसूण :
लसुणामुळे देखील डास दुर राहण्यास मदत होते. लसुणाच्या उग्र वासामुळेच डास तुमच्यापासुन व तुमच्या घरापासून दूर राहतात. याकरिता लसणाच्या काही पाकळ्या ठेचून ,पाण्यात उकळून घ्या. हे पाणी तुम्ही तुमच्या घराजवळ फवारा. जर तुम्ही अगदीच साहसी असाल तर हे पाणी तुम्ही तुमच्या शरीरावरदेखील फवारू शकता. यामुळे तुमचे डासांपासुन रक्षण होईल.
6)टी ट्री ऑईल :
टी ट्री ऑईलमुळे तुमच्या त्वचेचे व केसांचे आरोग्य सुधारते, त्यातअॅन्टीबॅक्टेरिएल, अॅन्टीफंगल घटकही आहेत हे सारे तुम्ही जाणताच पण टी ट्री ऑईल डासांनादेखील दूर ठेवते हे तुम्हाला माहित आहे का? या तेलातील अॅन्टीबॅक्टेरिएल, अॅन्टीफंगल घटक व त्याचा वास यामुळे डासांचा दंश होण्यापासुन तुमचे रक्षण होते. म्हणूनच जर तुम्हाला टी ट्री ऑईल वापारायचे असेल तर हे तेल तुम्ही अंगाला लावू शकता किंवा या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून तुम्ही वाफही घेऊ शकता. यामुळे तुमचे डासांपासून नक्कीच रक्षण होईल.
7) पुदिना :
जर तुम्हाला पुदिन्याच्या वासाने शांत व आरामदायी वाटत असेल तर डासांपासून तुमचे रक्षण करण्यास पुदिन्याचा नक्की वापर करा. ‘Journal of Bioresource Technology ‘ च्या अभ्यासानुसार पुदिन्याचा अर्क व पुदिन्याचे तेल तुमचे डासांपासून निश्चितच रक्षण करू शकेल. याकरिता तुम्ही पुदिन्याचे रोपटे घरजवळ किंवा खिडकीत लावू शकता ,त्याचे तेल अंगाला लावू शकता . याच बरोबर तुम्ही पुदिन्याच्या वासाचे माऊथवॉश पाण्यासोबत मिसळून ते घराजवळ फवारू शकता.
8) लॅवेंडर :
लॅवेंडरचा अप्रतिम सुगंध तुम्हाला प्रसन्न कर करतोच पण त्याचसोबत डास देखील लांब राहण्यास फार मदत होते. लॅवेंडरच्या अप्रतिम सुवासामुळे डासांचा दंश होण्यापासुन तुमचे रक्षण होते. लॅवेंडरचा उपयोग तुम्ही घरात रूम फ्रेशनर म्हणून देखील करू शकता किंवा त्याचे तेल तुम्ही अंगाला लावले तरीही तुमचे डासांपासून रक्षण होते.
9) गवती चहा :
गवती चहाच्या अर्कापासून तयार होणारे तेल डासांना दुर ठेवण्यात अत्यंत प्रभावी आहे. केमिकलयुक्त रॅपॅलंट पेक्षा गवतीचहाचा अर्क किंवा तेल वापरणे केव्हाही चांगलेच! याकरिता गवती चहाचा अर्क मेणबत्तीवर टाका किंवा त्याचे थेंब पाण्यात टाकून वाफ घ्या.
10) झाडे लावा :
जर तुम्हाला वाटत असेल की, घराभोवती असलेल्या झाडा-झुडपांमुळे डासांचे प्रमाण वाढत आहे तर हा चुकीचा समज आहे. घराभोवती योग्य झाडे लावल्यास डासांपासुन तुमचे रक्षण होण्यास नक्कीच मदत होईल. घराभोवती तुळस, पुदिना, गोंडा, गवतीचहा यासारखी झाडे लावल्यास तुमचे नैसर्गिकरित्याच डासांपासून रक्षण होईल.

No comments:
Post a Comment