संतवाणी
काय काशी करिती गंगा।भीतरी चांगा नाही तो।।
अधणी कुचर बाहेर तैसा। नये रसा पाकासी।।
काय टिळे करिती माळा।भाव खळा नाही त्या।।
तुका म्हणे प्रेमे वीण।बोले मुके अवघा शीण।।
अर्थ- ज्याचे अंतःकरण निर्मळ नाही त्याला काशी आणि गंगा काय करील?।।
कडधान्यातील कुचर दाणा आधनात शिजत नाही. त्याचा पाकाला किंवा रसाला उपयोग होत नाही.।।
मनात भाव नसतांना, दुष्ट माणसाने माळ घातली, टीळा लावला तरी उपयोग काय?।। तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनात प्रेम नाही असा माणूस बोलला तर ते कुत्र्याच्या भुंकण्यासारखे आहे. त्यामुळे इतरांना शीण (त्रास) होईल.
तिर्थक्षेत्रावर विधी करणे हा कर्मकांडाचा प्रकार आहे. त्याऐवजी संत तुकाराम आत्मशुद्धीला महत्व देतात. माणसाच्या बाह्य स्वरूपाला व त्याला जोडून येणाऱ्या कृतीला ते गौन स्थान देतात.
माणसाच्या अशुद्ध मनाला त्यांनी कुचर दाण्याची उपमा दिली आहे. माणसाने गंध लावला, गळ्यात माळ घातली. या माणसाचे मन निर्मळ नाही म्हणजे हे त्याने केलेले ढोंग आहे. सज्जनपणाचा आव आल्यासारखे आहे. त्यामुळे अशा माणसांच्या वागण्यामुळे समाजाचे काहीही हित होणार नाही. याउलट इतरांना त्याचा त्रास होईल. अशी ढोंगी वागणूक समाजाला घातक आहे.
✍🏼 जगद्गुरू संत तुकाराम महाराज
📒 संकलन : अर्चना खोब्रागडे तिरपुडे जी.प.शाळा जवळगाव ता.नेर

No comments:
Post a Comment