संतवाणी
सर्वा भुती द्यावे अन्न । द्रव्य पात्र विचारोन।
उपतिष्ठे कारण । तेथे बीज पेरिजे।।
पुण्य करिता होय पाप । दूध पजोनि पोशीला साप।
करोनि अघोरी जप । दुःख विकत घेतले।।
भूमी पाहता नाही वेगळी । माळ बरड एक काळी।
उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ।।
म्हणोनि विवेके काही करणे निके।
तुका म्हणे फिके । रुची नेदी मिष्टान।।
अर्थ - सर्व प्राणिमात्रांना अन्न द्यावे. पण द्रव देताना त्याच्या पात्रतेचा विचार करावा. जेथे बी उगवेल तेथेच पेरावे.।।
पुण्य करण्याच्या नावाखाली जर चुकीच्या माणसाला दान दिले तर ते पाप होईल. अघोरी पध्दतीने जर जप केला तर ते दुःख विकत घेतल्यासारखे आहे.।।
ढोबळमानाने पहिले तर शेतजमीन सारखीच दिसते पण बारकाईने विचार केला तर माळरान, भरकड, काळी, उत्तम, हलकी असे या शेतजमिनीचे वेगवेगळे प्रकार दिसतात.।।
तुकाराम महाराज म्हणतात जे काही करायचे ते विचारपूर्वक करावे. प्रत्येक प्रसंगात विवेकबुद्धी ठेऊन वागावे. अन्ना मध्ये मीठ नसेल तर ते बेचव लागते. त्याचप्रमाणे जीवनात विवेक नसेल तर ते बेचव होते.।।
शेतीची जमीन वेगवेगळ्या प्रकारची असते. सगळ्या जमिनीवर पेरलेल्या बियांची सारखीच उगवण होणार नाही. माळरानावर तर पिकसुद्धा येणार नाही. त्यामुळे आपल्या विचारशक्तीने निर्णय घ्यायचा असतो.
समाजाचीसुद्धा तीच परीस्थिती आहे. तुकारामांनी पाप पुण्याची सोपी व्याख्या केली आहे. दुसऱ्यावर उपकार करणे म्हणजे पुण्य व दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे पाप. बरेच वेळा भोळेपणामुळे, अज्ञानामुळे आपल्या मनात चांगला हेतू असूनसुद्धा आपण जे काही करतो त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. कोणतीही गोष्ट करताना विवेकपूर्ण वागावे. असे महाराजाना सांगायचे आहे.
✍ जगद्गुरु संत तुकाराम महाराज
📙 संकलन : अर्चना खोब्रागडे

No comments:
Post a Comment