EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Friday, July 27, 2018

कर्करोग

कर्करोग

कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे.प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशीँची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत.
बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणार्‍या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात.
जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसर्‍या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसर्‍या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers