अभंग न भंगे, अखंड न खंडे ।
गंगे मिळणे सिंधु जैशा ।।
अर्थात
“अनेक नद्या एकदा का समुद्रात जाऊन मिळाल्या, की त्या ज्याप्रमाणे समुद्रापासून वेगळ्या करता येत नाहीत. त्याप्रमाणे ‘अभंग’ हे भंग पावणार नाहीत, आणि ‘अखंड’ हे खंडणार नाहीत.”
तुकोबारायांनी अभंगात लिखाण केले. वरील या गोष्टीचा संदर्भ लक्षात घेऊन महात्मा फुलेंनी त्यांचे लिखाण अखंडात लिहिले.
म्हणून तर, तुकोबांचे अभंग भंगणार नाहीत आणि ज्योतिबांचे अखंड खंडणार नाहीत.
महात्मा फुलेंचं काम हे तुकोबारायांचंच काम आहे, हे लक्षात घेऊन, सावित्रीमाई फुले म्हणतात,
तुका जैसा, तैसा ‘संत’ ज्योती ।
शुद्ध ज्ञान देई जना, नीति मती
माझे पती ज्योतिबा हे संत तुकोबांप्रमाणेच आजचे संत आहेत. कारण, लोकांना नीति आणि मतीचं जे शुद्ध ज्ञान तुकोबांनी दिलं, तेच शुद्ध ज्ञान आज माझे पती ज्योतिबा देत आहेत. म्हणून संत तुकोबांप्रमाणेच माझे पतीही संतच आहेत.
तुकोबांना ज्योतिबांमध्ये पाहणाऱ्या सावित्रीमाई धन्य होत.

No comments:
Post a Comment