EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Thursday, July 26, 2018

*सत्य-असत्याशी मन केले ग्वाही।मानियले नाही बहुमता।।*


संतवाणी*


*सत्य-असत्याशी मन केले ग्वाही।मानियले नाही बहुमता।।*

_*अर्थ-* ज्याची स्वातंत्र्यावर अतूट, अमिट निष्ठा असते, तो आपल्या तत्त्वासाठी एकाकीपणानं प्रवास करण्याचं असं धैर्य दाखवतो, त्यासाठी आपली उत्कट इच्छाशक्ती वापरू शकतो. हा दुराग्रह नव्हे, अहंकार नव्हे वा इतरांविषयीचा अनादरही नव्हे. प्रसंगी आपलं विवेकाधिष्ठित स्वातंत्र्य जपण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागतं, ज्यांची मतं चूकीची वा अन्यायाची असतात त्यांची संख्या मोठी असली तरी त्यांच्या विरोधात निर्णय घ्यावे लागतात, हे तुकारामांनी या वचनातून स्पष्ट केलं आहे. अशा रीतीनं आपली इच्छाशक्ती न वापरणारी मानसं मात्र आपलं स्वातंत्र्य गमावून नुसती होयबा बनतात, लाचारी पत्करतात वा गुलाम होतात._

     _हजारो वर्षाच्या परंपरा असोत की कोट्यावधी लोकांची मते असोत, ग्रँथ असोत की गुरू असोत, वृत्तवाहिन्या असो की इंटरनेट असो या कोणत्याही दिशेनं येणार जे काही असेल त्या सगळ्याची आपल्या विवेकाच्या कसोटीवर छाननी करून मगच काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हे ठरविलं असता आपण आपल्या स्वातंत्र्याचं अतिशय निकोप पद्धतीनं रक्षण करू शकतो. अर्थात यासाठी डोळसपना आणि धैर्य असावं लागतं. संत तुकारामांनी आपल्या या अभंगातून ही भावना अगदी उत्तम रीतीनं व्यक्त केली आहे._

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers