EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Thursday, July 26, 2018

चंद्रग्रहण…


            * चंद्रग्रहण…*


* २७ जुलै रोजी दिसणार ब्लड मून...*
*____________________________*
* २१ व्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी २७ जुलै रोजी दिसणार आहे.*
 * या चंद्रग्रहणाचा कालावधी १ तास ३४ मिनिटांचा असेल.*
 * या काळात चंद्र अतिशय सुंदर अशा लालसर रंगात दिसेल.*
* चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणाप्रमाणे डोळ्य़ांना हानीकारक नसते, त्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.*
*पावसाने या कालावधीत कृपा केल्यास २७ आणि २८ च्या रात्री पूर्ण चंद्रग्रहण दिसेल.*
* विशेष म्हणजे यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या लपाछपीचा खेळ देशाच्या बऱ्याचशा भागात पहायला मिळेल.*

* खंडग्रास ग्रहण तासाभरापेक्षा जास्त काळ चालेल.*
* २७ जुलैला खंडग्रास ग्रहण रात्री ११.५४ वाजता सुरू होईल व खग्रास चंद्रग्रहण २८ जुलैला पहाटे १ वाजता सुरू होईल, पहाटे १.५२ वाजता चंद्र काळा दिसेल.*
* ती अवस्था पहाटे २.४३ पर्यंत राहील.*
*यानंतर चंद्र खंडग्रास अवस्थेत पहाटे ३.४९ वाजता दिसेल.*
* २७ जुलैला चंद्र पृथ्वीपासून काहीसा दूर जाणार असल्याने तो वर्षातील सर्वात लहान पूर्ण चंद्र असेल.*
 * सुरुवातीला चंद्र काहीसा नारंगी नंतर रक्तवर्णी तांबडा आणि मग करडा होऊन तो गडद होत जाईल.*
* याआधीचे चंद्रग्रहण ३१ जानेवारीला झाले होते तर पुढील चंद्रग्रहण २१ जानेवारीला होणार असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.*

* जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते.*
 * चंद्रग्रहण ही एक पूर्णत वैज्ञानिक खगोलीय घटना आहे.*
* चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही.*
* सुर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली प्रछाया व उपछाया अशी दोन प्रकारची असते.*
* आता शुक्रवारी होणारे चंद्रग्रहण भारताबरोबरच अंटाक्र्टिका, ऑस्ट्रेलिया, रशियाचा काही भाग, संपूर्ण आशिया, आफ्रिका, युरोप, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथून दिसेल.*

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers