EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Monday, July 30, 2018

कौटुंबिक कलहाचे खटले हाताळणा-या न्यायाधीशांनी दिलेले दहा बहुमोल सल्ले -


कौटुंबिक कलहाचे खटले हाताळणा-या न्यायाधीशांनी दिलेले दहा बहुमोल सल्ले -

तुमचा मुलगा आणि   सून यांना तुमच्यासोबत  एकाच घरात राहण्याचा आग्रह मुळीच करू नका. त्यांना घराबाहेर पडायला सांगा. अगदी भाड्याच्या घरातसुद्धा राहू देत. घर शोधणे हा त्यांचा प्राॅब्लेम आहे. तुमचा नाही. दूर राहिल्यानेच जवळीक वाढेल.

तुमच्या मुलाच्या पत्नीला तुमची मुलगी म्हणून नव्हे तर त्याची बायको म्हणूनच वागवा. फार तर मैत्रीण म्हणून वागवा. तुमचा मुलगा हा तुमचा ज्युनियर आहे. पण त्याच्या बायकोला तसेच समजू नका. तुम्ही तिला अधिक उणे बोललात, तिची निंदानालस्ती केलीत तर ते तिच्या जन्मभर लक्षात राहिल.

तुमच्या मते तुमच्या  सुनेमध्ये काही दोष, उणीवा असल्या तर तो तुमचा प्राॅब्लेम अजिबात नाही. तो तुमच्या मुलाचा प्राॅब्लेम आहे. आणि तो सज्ञान आहे. त्याचे तो बघून घेईल.

अगदी तुम्ही एकत्र राहत असलात तरी एकमेकांच्या व्यवहारात फाजील लक्ष न घालणेच इष्ट. मुलगा व त्याची पत्नी यांची लाँड्री. त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, त्यांची मुले सांभाळणे हे करायची आवश्यकता नाही. हां, आता तुमच्या मुलाने व सुनेने तशी खास विनंती केली असेल व तुम्ही त्यासाठी सक्षम असलात तर गोष्ट वेगळी. मात्र अशी काही जबाबदारी घेतलीच तर मोबदल्याची अपेक्षा करू नका.

मुलाचे आणि त्याच्या बायकोचे तुमच्यासमोर भांडण झाले तर आंधळे, बहिरे, मुके असल्यासारखे वागा. कारण नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्या व्यक्तीने, अगदी आईवडिलांनीसुद्धा हस्तक्षेप केलेला कुणालाच आवडत नाही.

तुमची नातवंडे ही प्रथमतः तुमच्या मुलाची व सुनेची आहेत. त्यांना  स्वतःची मुले कशा प्रकारे  वाढवायची आहेत हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे.  आणि त्याचे यश किंवा अपयशही त्यांचेच आहे.

तुमच्या मुलाच्या पत्नीने तुमच्याबद्दल आदरभाव ठेवलाच पाहिजे आणि तुमची सेवा केली पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका. ते तुमच्या मुलाचे कर्तव्य आहे.

तुमच्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाचे यथायोग्य आर्थिक नियोजन वेळेत करून ठेवा. आर्थिकदृष्ट्या मुलावर अवलंबून राहू नका. पैसा म्हणजे सर्वस्व नसले तरी पैशाने ब-याच गोष्टी साध्य करता येतात. आर्थिक नियोजन योग्य असेल तर तुम्हाला म्हातारपणी पराधीन आयुष्य जगावे लागणार नाही.

निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात, मजेत जगणे हा तुमचा हक्क आहे. तुमच्या संपत्तीचा तुम्हाला तुमच्या हयातीत उपभोग घेता यायला हवा.

नातवंडे म्हणजे वंशवेलीवरची फुले, कुटुंबाचा ठेवा वगैरे गोष्टी डोक्यातून काढून टाका. नातवंडे हा त्यांच्या आईवडिलांचा अमूल्य ठेवा आहे. तो त्याना त्यांच्या पद्धतीने जपू दे.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers