EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Saturday, July 21, 2018

भौमितिक आकृत्यांची माहिती

 भौमितिक आकृत्यांची माहिती


■ चौकोन :-(१) चौकोनाला चार बाजू असतात. (२) चौकोनाला चार कोन असतात. (३) चौकोनाला चार शिरोबिंदू असतात.        ■ आयत :-(१) चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन     असल्यास त्याला आयत म्हणतात. (२)आयताला चार बाजू , चार कोन व चार     शिरोबिंदू असतात. (३) आयताच्या समोरासमोरील बाजू समान        लांबीच्या असतात. 
■ चौरस :-  (१) चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन    असून चारही बाजू सारख्याच लांबीच्या  असतील तर तो चौरस असतो. 
🔺 त्रिकोण :-   (१) त्रिकोण ही एक तीन बाजू असलेली         बंद आकृती आहे.     (२) त्रिकोणाला तीन बाजू ,तीन कोन व           तीन शिरोबिंदू असतात. 
◾ काटकोन :-  (१)९०अंशाच्या मापाच्या कोनाला काटकोन       म्हणतात. 
◾ लघुकोन :-    (१) काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन          म्हणतात. 
◾ विशालकोन :-     काटकोनपेक्षा मोठ्या कोनाला विशालकोन      म्हणतात. 
■ समभूज त्रिकोण :-    समभूज त्रिकोणाच्या तीनही बाजू समान     लांबीच्या असतात. 
■ समद्विभुज त्रिकोण :-     समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू समान      लांबीच्या असतात. 
■ विषमभुज त्रिकोण :-      विषमभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू भिन्न       लांबीच्या असतात.
■ समभूज चौकोन :-    एखाद्या चौकोनाच्या फक्त चारही बाजू     सारख्या लांबीच्या असल्यास तो समभूज    चौकोन होय.        

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers