EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Friday, July 27, 2018

आजचे पंचाग

0१ आजचे पंचाग

27. जुलै :: शुक्रवार
 आषाढ पूर्णिमा,  नक्षत्र : उत्तराषाढा
    योग : विश्कुंभ,  करण : विष्टी,
सूर्योदय : 06:13, सूर्यास्त : 19:16,

0२ ]     सुविचार


27. कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

0३ ]     म्हणी व अर्थ


27. राजा बोले दल हाले
     अर्थ ::~  सत्ताधिशाच्या हुकूुमाने सर्व काही घडते.

0४ ]    सुभाषीत


27. व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् |अर्थ ::~ या जगतातील सर्व ज्ञान हे व्यासांचे उच्छिष्ट आहे.

0५ ]     दिनविशेष

 27. जुलै
★हा या वर्षातील २०८ वा (लीप वर्षातील २०९ वा) दिवस आहे.

        ★ महत्त्वाच्या घटना ★

●२०१२    :    लंडन येथे ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
●२००१    :    सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर व  जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय
●१९२१    :    रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.

    ★जन्मदिवस / जयंती★
    ◆१९५५    :    अ‍ॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
◆१९११    :    डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण

      ★मृत्यू / पुण्यतिथी★

●२०१५: ए.पी.जे. अब्दुल कलाम   -- भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि भारतरत्न,
भारताचे अकरावे राष्ट्रपती
●२००२    :    कृष्णकांत – भारताचे १० वेउपराष्ट्रपती
●१९९२    :    अमजद खान – हिन्दी चत्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक
●१९८७    :     डॉ. सलीम अली –
 जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक
●१९७५    :    त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers