EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Tuesday, July 31, 2018

*❝ सूर्य आणि वायु ❞*


 * सूर्य आणि वायु *


       *सूर्य आणि वारा यांच्यात आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली.*        जवळच्याच एका वाटसरूच्या अंगावरची घोंगडी त्याला काढून ठेवण्यास जो भाग पाडेल तो पराक्रमी समजावा असे ठरले.        प्रथम वार्‍याने जोराने वाहून ती घोंगडी उडवण्याचा प्रयत्‍न केला. परंतु वार्‍यामुळे थंडी वाजून तो वाटसरू ती घोंगडी आणखीनच ओढून धरू लागला.       शेवटी वारा दमला, नंतर सूर्याने आपली प्रखर किरणे वाटसरुच्या अंगावर सोडली. उन्हाने त्या माणसाला खूप उकडू लागले. घामाच्या धारा वाहू लागल्या तेव्हा त्याने ती घोंगडी काढून ठेवली व तो सावलीत जाऊन बसला.       * तात्पर्य    *नुसत्या शक्तीचा उपयोग नाही.*


No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers