EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Friday, July 20, 2018

देशभक्ती गीत

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂
 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


20. आला किनारा आला किनारा
        ●●●●●००००००●●●●●
आला किनारा, आला किनारा
निनादें नभीं नाविकांनो इशारा

उद्दाम दर्यामधे वादळी
जहाजे शिडावून ही घातली
जुमानीत ना पामरांचा हकारा

प्रकाशें दिव्यांची पहा माळ ती
शलाका निळ्या-लाल हिंदोळती
तमाला जणु अग्‍नीचा ये फुलोरा

जयांनी दलें येथ हाकारली
क्षणासाठी या जीवनें जाळली
सुखेनैव स्वीकारुनी शूल-कारा

तयांच्या स्मृती गौरवे वंदुनी
उभे अंतीच्या संगरा राहुनी
किनार्‍यास झेंडे जयाचे उभारा

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers