EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Thursday, August 2, 2018

! आजचा विचारधन ! !🌟

!  आजचा विचारधन ! !🌟


एखाद्या उंच डोंगरावरच्या छोट्याशा मंदिरात, जिथला देव नवसाला न पावल्यामुळे एकाकी आहे, ज्याला मिणमिणती पणती पुरते, सकाळ संध्याकाळची किणकिणत्या छोट्या घंटेची संगीतमय पूजा पुरेशी असते. अशा मंदिरात पायउतार झाल्यास तिथली शांतता सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात ईश्वराची अनुभूती देते. तिथल्या शांततेला जो एक 'ध्वनी' असतो तो कानात आत्मशोधाची रूंजी घालतो आणि आपोआप मूक संवाद सुरू होतो. ही शांतता नेमकं काय सांगते, हे समजण्याची कुवत असल्यास आनंदाचा परमोच्च बिंदू सापडू शकतो.

कानठळे बसवणारा गोंगाट, मस्तक फिरवणारा कर्कश आवाज, वातावरण चिरणा-या उद्विग्न किंकाळ्या, पर्यावरणाची धूळदाण करणारा भेदक हिंसात्मक आवाज हे सर्व आधुनिक काळातले शांततेचे शत्रू. माणूस एका बाजूने हे सर्व 'हवयं' म्हणून लोकांमध्ये उधळत वाटत सुटला आणि दुसरीकडे 'नको नको' म्हणत वेडापिसा होऊन शांततेचा शोध घेत बसला. मानवनिर्मित 'आवाज' ते ईश्वरनिर्मित 'शांतता' यांचे द्वंद्व सुरू आहे. माणूस शांततेचा शोध घेत पुन्हा 'हिलस्टेशन' वर पोहचला आहे. पण ख-या अर्थाने शांतता तेव्हा मिळेल जेंव्हा तो अध्यात्माच्या आधारे 'शांतता' ओळखेल. "दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती" या उक्तीप्रमाणे दया, क्षमा माणसाच्या हातात आहेत, नाही ती 'शांतता.'... ती ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे.

    ••●★‼ रामकृष्णहरी ‼★●••

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers