EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Wednesday, July 18, 2018

संतवाणी

संतवाणी


वंदिले वंदावे जीवचिये साठी।किंवा बरी तुटी आरंभीच।।

स्वहिताची चाड ते ऐका हे बोल।अवघेचि मोल धिरा अंगी।।

सिंपील ते रोप वरीवरी बरे।वाळलीया वरी कोंब नये।।

तुका म्हणे टाकी घाये देवपण।फुटलिया  जण कुला पुसी।।

अर्थ - या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात प्रयत्नांमध्ये विवेक आणि औचित्य महत्वाचे आहे. रोपाला जसे पाणी घालून वाढवावे लागते, नसता वाळल्यावर कितीही पाणी घातले तरी कोंब फुटण्याची श्यक्यता नसते. म्हणजे प्रयत्न हे योग्य वेळेत आणि नियमित केले पाहिजे. टाकीचे घाव सोसल्यानेच दगडाला सुद्धा देवपण प्राप्त होते आणि जर ती दगडाची मूर्ती फुटली तर लोक तिचा कुला पुसण्यासाठी उपयोग करतात. दगडाच्या मूर्तीचे उदाहरण तुकाराम महाराज यासाठी देतात की जीवनात कुठेही माघार न घेता संघर्षाला तोंड देत राहिले पाहिजे तरच यशस्वी जीवन जगता येते.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers